Sanvidhanvarta Blog Blog शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर
Blog आणखी मनोरंजन शेत शिवार

शेत जमीन मोजणीच्या दरात झाली वाढ; कोणती मोजणी किती रुपयांत वाचा सविस्तर

कोल्हापूर : शासनाने शेतजमीन आणि प्लॉटमोजणी शुल्कात सरासरी दुपटीने वाढ केली आहे. लाडकी बहीण, भाऊ अशा लोकप्रिय योजनांमुळे शासनाच्या तिजोरीत खड्डा पडल्याने मोजणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या खिशाला जादाची कात्री लावली गेली आहे.

त्याचा बोजा शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. त्याची भरपाई करण्यासाठी शासन आता विविध शासकीय शुल्कांत जबर वाढ करीत आहे. शंभर, २०० रुपयांचे मुद्रांक बंद करून ते थेट ५०० रुपये केले.

आता शेतजमीन, प्लॉटमोजणीच्या शुल्कातही घसघशीत वाढ केली आहे. नवीन दरवाढीच्या अंमलबजावणीत या महिन्यापासून होणार आहे. त्यामुळे जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

Exit mobile version