Sanvidhanvarta Blog Blog आता शेत रस्ते घेतील मोकळा श्वास; मातोश्री ग्राम समृध्दी शेत पाणंद रस्ते योजना
Blog शेत शिवार

आता शेत रस्ते घेतील मोकळा श्वास; मातोश्री ग्राम समृध्दी शेत पाणंद रस्ते योजना

राज्यात “मातोश्री ग्राम समृध्दी शेत-पाणंद रस्ते योजना” नोव्हेंबर – २०२१ सालापासून कार्यन्वीत करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश असा की, शेतमाल पोहोचविण्यासाठी रस्ते नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने “मातोश्री ग्राम समृध्दी शेत-पाणंद योजना” (Matoshri Gramsamruddhi Shet-Panand Road Scheme) लागू केली आहे. या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतीसाद  मिळतोय.

शेतीमधील कमी होणारी मनुष्यबळाची उपलब्धता लक्षात घेता शेतीची कामे करण्यासाठी यंत्रांचा उपयोग केला जातो. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतमाल बाजारात पोहचविण्याकरीता बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते.

Exit mobile version