Sanvidhanvarta Blog Blog सोमनाथ सुर्यवंशी यांचा अंत्यविधी लातूरमध्ये करण्यासाठी पोलिसांची जबरदस्ती
Blog

सोमनाथ सुर्यवंशी यांचा अंत्यविधी लातूरमध्ये करण्यासाठी पोलिसांची जबरदस्ती

सोमनाथ सूर्यवंशी यांची बॉडी पाचोड येथे पोलिसांनी अडवली  #news #drbabasaheambedkar #marathinews

परभणी : परभणी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरवादी तरुणाचा अंत्यविधी लातूरमध्ये करण्यात यावा त्यासाठी खांबे नावाचे पोलीस अधिकारी जबरदस्ती करत असल्याची घटना समोर येत आहे.

भीमसैनिक सुर्यवंशी यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी परभणीकडे घेऊन जात असताना पोलिसांनी पाचोड जवळ त्यांचे पार्थिव अडवले आणि लातूर मध्ये अंत्यविधीसाठी जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे.

परभणी शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर दाखल झाले आहेत. त्यांनी परभणीतील घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी सुर्यवंशी यांचे शवविच्छेदन कॅमेऱ्याच्या समोर व्हावे असे सुचवले होते. त्यानंतर शवविच्छेदन कॅमेऱ्यासमोर करण्यात आले. आणि अंत्यविधीसाठी पार्थिव परभणी येथे जात असताना पोलिसांनी पार्थिव अडवल्याची गंभीर घटना घडली आहे.

संविधान वार्ता न्यूज
मुख्य संपादक: विनोद कांबळे
कार्यकारी संपादक: अनिलकुमार शेट्टी
बातम्या व जहिरतिकरिता संपर्क
86557 45220 / 70399 39988

Exit mobile version